महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मोर्चा - अशोक साबळे

दिल्ली येथील तुगलकाबाद येथे असलेल्या संत रविदास महाराजांच्या मंदिराची दिल्ली सरकारने तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज मस्तगड येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

जालन्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मोर्चा

By

Published : Aug 21, 2019, 11:37 PM IST

जालना -दिल्ली येथील तुगलकाबाद येथे असलेल्या संत रविदास महाराजांच्या मंदिराची दिल्ली सरकारने तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज मस्तगड येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

जालन्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मोर्चा

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथील मंदिर प्रशासनाने पाडले आहे. हे मंदिर प्राचीन आहे .या मंदिराला दिल्ली सम्राट सिकंदर लोधी यांनी ही जमीन दान दिलेली होती. सातबारावर देखील तशीच नोंद आहे. असे असतानाही हे मंदिर पाडण्यात आले. असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. तरी हे मंदिर परत जसे होते बांधून द्यावे अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली आहे .या मोर्चामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश कुरील, डी .एस. सोनवणे, दीपक डोके, भारत भगुरे ,अशोक साबळे, एड.कैलास रत्नपारखे, आदींनी सहभाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details