जालना :राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांच्याशी राज्यातील आरोग्य आढावाबाबत बातचीत करताना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजकीय घडामोडींबाबतसुद्धा वक्तव्य केलेले आहे. एकंदरीत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ ( Political Crisess in Maharastra ) झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले असताना, आम्ही माननीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहोत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. आम्ही त्यांच्याबरोबर उत्तम पद्धतीने काम करीत आहोत. महाविकास आघाडीसोबत उभे राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली : राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबतदेखील टोपे यांनी भाष्य करीत काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवार साहेबांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शरद पवार यांच्या सूचनेनुसार वाटचाल केली जाईल, असेही ते म्हणाले.