महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात ढोल-ताशांच्या गजरात रामजन्मोत्सव उत्साहात - पोलीस

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेल्या येथील श्रीराम मंदिरात आज श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रामदास महाराज आचार्य यांनी कीर्तन सेवा अर्पण केली. रामजन्मोत्सवानंतर रामलल्लाची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि जानकी महिला मंडळांनी एका तालात एका सुरात पालखीसमोर खेळलेल्या पावल्या हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात

By

Published : Apr 13, 2019, 11:09 PM IST

जालना- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेल्या जालन्यातील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ढोल-ताशाचा गजर आणि जानकी महिला मंडळाने खेळलेल्या पावल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी रामदास महाराज आचार्य यांच्या मधुर वाणीतून राम जन्मोत्सवाची कीर्तन सेवा अर्पित करण्यात आली.

श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात

श्रीराम मंदिरामध्ये पाडव्याच्या दिवशी गुढी उभारून आणि कोठी पूजन करून श्रीराम जन्मोत्सवाच्या महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता. दैनंदिन काकड आरती, उपासने यासोबतच अध्यात्मरामायण यावेळी सुरू होते. दररोज महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी होत होती. त्याचसोबत पहाटेची भजन सेवा, सायंकाळी कीर्तन आणि संध्याकाळचे भजन सेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

आज श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रामदास महाराज आचार्य यांनी कीर्तन सेवा अर्पण केली. रामजन्मोत्सवानंतर रामलल्लाची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि जानकी महिला मंडळांनी एका तालात एका सुरात पालखीसमोर खेळलेल्या पावल्या हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. या जन्मोत्सवासाठी विशेष उपस्थितीमध्ये जाफराबाद येथील भास्कर महाराज देशपांडे, शेष महाराज, भागवत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

रामजन्मोत्सवानंतर भाविकांनी फराळाचा लाभ घेतला त्यानंतर दुपारच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. व्यासपीठावर सद्गुरू भक्त प्रल्हाद महाराजांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या होत्या. यावेळी आकर्षक केलेला देखावासुद्धा या जन्मोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग ठरला.

आज रामनवमीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन शुक्रवारी रात्रीच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी मंदिराला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. प्रल्हाद महाराज सेवा समितीच्यावतीने राम जन्मोत्सवनिमित्त आलेल्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पानपोईच्या सेवेची सोय केली होती. दरम्यान, राम जन्मोत्सवानिमित्त मंदीर परिसरामध्ये मोठी यात्राही भरली.

ABOUT THE AUTHOR

...view details