महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्दी कमी करण्यासाठी नामी युक्ती... पारावर टाकले वंगण - कोरोना जालना बातमी

पारावर बैलगाडीच्या चाकात घालायचे वंगण टाकले आहे. हे वंगण जसेजसे ऊन तापल तसे गरम होते. त्यामुळे येथे कोणी बसलेच तर त्याला चांगलेच चटकेही बसतात. वंगणाचा डाग कपड्यावर लागला तर कधीही निघत नाहीत. त्यामुळे या पारावर बसणाऱ्यांची गर्दी आता बंद झाली आहे.

ramnagar-a-village-in-jalna-district-did-this-for-corona-virus
गर्दी कमी करण्यासाठी नामी युक्ती..

By

Published : Mar 28, 2020, 8:15 AM IST

जालना-जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासना वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर येऊन बसू नये यासाठी जालना तालुक्यातील रामनगर येथे शक्कल लढवण्यात आली आहे. गावात गर्दी होणाऱ्या अनेक पारावर वंगण टाकून पारावर बसणाऱ्यांची व्यवस्था खंडीत करण्यात आली आहे..

गर्दी कमी करण्यासाठी नामी युक्ती..

हेही वाचा-'आपण मंदीतच, ही स्थिती २००९हून अधिक वाईट असणार'

शहरातील नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन काम करीत आहे. मात्र, ग्रामीण जनतेचे काय? हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे रामनगर (साखर कारखाना) येथे गावामध्ये मारुतीच्या पारावर (मंदिराचा ओटा) एका दक्ष नागरिकाने वंगण टाकले आहे. गावातील मंदिराचा पार हा गप्पा मारण्यासाठी ठरलेले ठिकाण असते. सकाळी आठ नऊ वाजेच्या सुमारास आणि सायंकाळी पाच नंतर हे पार गाव भरातील बातम्या इकडून तिकडे पाठविण्यासाठी महत्वाचे ठिकाण असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्यामुळे वगंण टाकून येथील गर्दी बंद केली आहे.

या पारावर बैलगाडीच्या चाकात घालायचे वंगण टाकले आहे. हे वंगण जसेजसे ऊन तापल तसे गरम होते. त्यामुळे येथे कोणी बसलेच तर त्याला चांगलेच चटकेही बसतात. वंगणाचा डाग कपड्यावर लागला तर कधीही निघत नाहीत. त्यामुळे या पारावर बसणाऱ्यांची गर्दी आता बंद झाली आहे.

तसेच गावात औषधाची धूर फवारणी सुरू झाली आहे. रामनगर हे छोटेसे खेडे मात्र कोरोना संदर्भात अत्यंत जागृत झाले आहे. गावात येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीकडे या सर्व बाबींची नोंद देखील आहे. पारावर टाकलेल्या या वंगणामुळे सध्या हे गाव चर्चेत आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details