भोकरदन (जालना) - कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे उघडायला राज्य शासनाने दिवाळी पाडव्यापासून परवानगी दिली. त्यानुसार आज (सोमवारी) सकाळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या हस्ते राजूर येथील राजुरेश्वराची विधिवत पुजा करण्यात आली. तसेच हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. हे देवस्थान साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे.
सरकारने आणि प्रशासनाने मंदिर उघडायला वेळ केला -
गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. जगाच्या पाठीवर आपली लोकसंख्या जास्त असतानाही आपल्या देशात या महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला. त्याचे कारण वेळीच आपल्या पंतप्रधान यांनी लॉगडाऊन जाहीर केले. त्या मानाने जपान, स्पेन, इटली, युरोप या देशात लोकसंख्या कमी असूनही जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला. मात्र, असे असताना ही राज्य सरकारने मंदिर उघडायला परवानगी दिली नाही. सरकारने बियर बार, दारूचे दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्या ठिकाणी गर्दीही होऊ लागली. मंदिर उघडावे, अशी देशातील सर्व भक्तांची इच्छा होती. मात्र, राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष करत मंदिर उघडायला उशीर केला, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.