महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजेशे टोपे पूर्ण माहिती न घेताच वक्तव्य करतात, अमित देशमुखांचा सरकारला घरचा आहेर - amit deshmukh news

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पूर्ण माहिती न घेताच कुठलेही वक्तव्य करतात असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना चाचण्या संदर्भात खरेदी करण्यात आलेले साहित्य सदोष असल्याची टिका सर्वत्र सुरू झाली होती. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता, त्यांनी हे साहित्य वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत खरेदी करण्यात आल्याचं सांगितले होेते. त्यावर आता देशमुख यांनी प्रतिक्रीया दिलीये. टोपे हे पूर्ण माहिती न घेताच बोलतात असं त्यांनी म्हटले आहे.

amit deshmukh statement on Rajesh Tope
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

By

Published : Oct 14, 2020, 6:13 PM IST

जालना -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पूर्ण माहिती न घेताच कुठलेही वक्तव्य करतात असं त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना चाचण्या संदर्भात खरेदी करण्यात आलेले साहित्य सदोष असल्याची टिका सर्वत्र सुरू झाली होती. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता, त्यांनी हे साहित्य वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत खरेदी करण्यात आल्याचं सांगितले होेते. त्यावर आता देशमुख यांनी प्रतिक्रीया दिलीये. टोपे हे पूर्ण माहिती न घेताच बोलतात असं त्यांनी म्हटले आहे. ते असे का बोलले? यासंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

दरम्यान कोरोना चाचणीच्या किट बनावट असल्या संदर्भात त्यांना विचारले असता, अमित देशमुख म्हणाले की या किट केंद्र सरकारच्या संस्थेने निर्धारीत केलेल्या पुरवठादारांकडून खरेदी केल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकार आयसीएमआर आणि राज्य सरकार या किटचा संबंधित रुग्णालयांना पुरवठा करते, पुरविण्यात आलेल्या किट बनावट असल्याचाही तपास आम्हीच लावल्याचं ते म्हणाले. ज्या कीटमधून रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्या रुग्णांची फेर तपासणी करण्याच्या सूचनाही ही दिल्या आहेत, तसेच सदोष कीट पुरवठा करणाऱ्या कंपनीला तुर्तास पुरवठा बंद करण्याच्या सूचना केल्याची माहितीही त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details