महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस कधीही भाजप सोबत जाणार नाही- राजाभाऊ देशमुख - jalna grampanchayat election

ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. स्थानिक पातळीवर पदाधिकारी निर्णय घेतील मात्र भाजप सोबत जाणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

jalna grampanchayat election
राजाभाऊ देशमुख ग्रामपंचायत निवडणुका

By

Published : Dec 29, 2020, 11:08 AM IST

जालना - ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. स्थानिक पातळीवर पदाधिकारी निर्णय घेतील मात्र भाजप सोबत जाणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसचा स्थापना दिवस
136 वर्षांपूर्वी म्हणजेच 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. या स्थापना दिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी जालन्यात भगवान बाबा मंगल कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप सोबत जाणार नाही
भाजपसोबत जाणार नाहीग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना इतर पक्षासोबत युती करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु काँग्रेस पक्षाचा उमेदवारानेच या निवडणुका लढवाव्यात यासाठीदेखील आग्रह धरण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ते शक्य नाही अशा ठिकाणी भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत जावे अशी सूट काँग्रेसच्या उमेदवारांना देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.काँग्रेस पक्ष स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित केला होता.हेही वाचा -'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताचा डंका, ८ गडी राखून नोंदवला विजय

ABOUT THE AUTHOR

...view details