महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाल्यावरील अतिक्रमणाचा फटका; आजी-माजी मंत्र्यांसह सर्वसामान्यांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

जुन्या जालन्यातील भाग्यनगर ही एक उच्चभ्रू वस्ती आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची याच भाग्यनगरमध्ये उत्तर आणि दक्षिण दिशेला बंगले आहेत. याच भाग्यनगरच्या कोपऱ्यावर नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे.

By

Published : Sep 21, 2020, 6:38 PM IST

jalna
आजी-माजी मंत्र्यांच्या घरासह गरिबांच्या घरात शिरले पाणी

जालना - नगरपालिकेचे नाला स्वच्छतेकडे असलेले दुर्लक्ष आणि यातूनच नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे रात्री पडलेल्या पावसाचे पाणी आजी माजी मंत्र्यांच्या बंगल्यात शिरले आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घराकडे जाण्यासाठी गुडघ्याइतक्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांची ही परिस्थिती तर गरिबांच्या घराचे काय? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. या सर्व प्रकाराकडे नगरपालिकेने सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे नाल्यावर झालेली अतिक्रमणे आणि नाल्यात वाढलेली झाडे यामुळे हे पाणी तुंबून मंत्र्यांच्या घरात शिरले आहे.

नाल्यावरील अतिक्रमणामुळे आजी-माजी मंत्र्यांच्या घरासह गरिबांच्या घरात शिरले पाणी

जुन्या जालन्यातील भाग्यनगर ही एक उच्चभ्रू वस्ती आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची याच भाग्यनगरमध्ये उत्तर आणि दक्षिण दिशेला बंगले आहेत. याच भाग्यनगरच्या कोपऱ्यावर नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. तसेच हे पाणी दुसरीकडून वाट काढून पुढे गेल्यानंतर दुकानांमध्ये हे शिरले आहे. या दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नाल्यात झाडं जास्त असल्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नाही. याच नाल्याच्या काठावर पुढे भोईपुरा आहे. या नाल्याचे पाणी रात्री या घरांमध्ये शिरल्यामुळे या परिवारांना रात्रभर जागे रहावे लागले. यात भांडे वाहून गेली, बसायलाही जागा राहिली नाही. अशा विचित्र परिस्थितीत येथील नागरिकांनी रात्र काढली आहे.

हेही वाचा -पालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच; उच्च न्यायालयाने भाजपाचा दावा फेटाळला

जालन्यात रविवारी 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण 901 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, कालच्यासारखी परिस्थिती यापूर्वी आली नव्हती. पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही पालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. त्यामुळे आतातरी हे मंत्री या प्रकाराकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या पावसामुळे जालना शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरात जागोजागी वाहतूक ठप्प होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details