जालना - गेल्या ताही दिवसांपासून रेल्वे स्थानक आणि रेल्वे प्रवासादरम्यान गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता रेल्वेने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्यामुळे 24 तास प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे अशी माहिती रेल्वे सुरक्षा आयुक्त तथा महानिरिक्षक जी.एम. ईश्वर राव यांनी दिली.
railway task force in jalna विश्राम गृहाचे उद्घाटनराज्य शासनाच्या स्टेट रिझर्व पोलीस प्रमाणेच रेल्वेने देखील आरपीएसएफ(रेल्वे पोलीस स्टेट फोर्स) ची स्थापना केली आहे. त्यामुळे आता रेल्वेतील प्रवाशांना 24 तास सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. औरंगाबाद ते परभणीपर्यंत सुरक्षा पुरवणार्या कर्मचाऱ्यांना थोडा आराम मिळावा म्हणून जालन्यात विश्राम ग्रहाची इमारत उभी केली आहे. त्यामुळे आता महिलांसोबतच सर्व प्रवाशांना चांगली सुरक्षा मिळेल. तसेच जादा गाडीमध्ये देखील पोलीस फोर्स देण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा भरण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सर्व जागा भरणे शक्य झाले नाही, त्यामुळे तुर्तास काही जागा भरल्या आहेत आणि लवकरच उर्वरित जागा भरण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याचेही ही सुरक्षा आयुक्त ईश्वर राव यांनी सांगितले.
भूमिगत रस्त्याचा ही प्रश्न मार्गी लावूजालना रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या रेल्वे फटका मुळे सरस्वती कॉलनी, विद्युत कॉलनी, जमुना नगर यासह जवळच असलेल्या रेवगाव बेथलम आदी खेड्यांच्या नागरिकांना या फटकामध्ये एक एक तास उभे राहावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या फाटकाला पर्यायी व्यवस्था म्हणून भूमिगत किंवा उड्डाणपूल तयार करावा अशी मागणी या नागरिकांची आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावाही केला आहे. मात्र दरवेळी रेल्वे प्रशासन लवकरच काम करू असे आश्वासन देत आहे. यासंदर्भात संबंधित इंजिनीयरशी बोलून हा प्रश्न देखील मार्गी लावण्याचे आश्वासन ईश्वर राव यांनी दिले आहे. या विश्राम गृहाच्या उद्घाटनाच्या वेळी नांदेड रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भूपेंदर सिंघ, तरुणेश त्रिपाठी रेल्वे सुरक्षा बोल आणि डॉक्टर एन.ज्योती यांचीही उपस्थिती होती.