जालना - चिंचोली निपाणी (ता.भोकरदन) येथे मेंढपाळावर हल्ला करणाऱ्या दोषींना तात्काळ शिक्षा मिळावी, तसेच मेंढपाळांसाठी अॅट्रासीटी अंतर्गत कायदा करण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन चिंचोली येथील घटनेबाबत चर्चा केली. तसेच चिंचोली येथे जाऊन जोशी कुटुंबीयांचा भेट घेऊन सांत्वन केले.
मेंढपाळावर हल्ला करणाऱ्या दोषींना तात्काळ शिक्षा करा - गोपीचंद पडळकर
चिंचोली निपाणी येथील मेंढपाळ रामदास कडुबा जोशी यांच्यावर काही समाजकंटाकांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचार घेताना त्यांचे नुकतेच निधन झाले. हीघटना संतापदायक असून, मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळर यांनी याप्रसंगी केली. कुठल्याही संकटातआपण मेंढपाळ समाजबांधवांच्या सोबत असल्याचे पडळकर यांनी याप्रसंगी सांगितले. जोशी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना पडळकर यांनी ५० हजारांची आर्थिक मदत केली.
चिंचोली निपाणी येथील मेंढपाळ रामदास कडुबा जोशी यांच्यावर काही समाजकंटाकांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचार घेताना त्यांचे नुकतेच निधन झाले. ही
घटना संतापदायक असून, मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळर यांनी याप्रसंगी केली. कुठल्याही संकटात
आपण मेंढपाळ समाजबांधवांच्या सोबत असल्याचे पडळकर यांनी याप्रसंगी सांगितले. जोशी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना पडळकर यांनी ५० हजारांची आर्थिक मदत केली.
यावेळी भोकरदनचे आमदार संतोष पा. दानवे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, बाळसाहेब तायडे, गणेशराव कोल्हे, लक्ष्मणराव घोलप, बाळासाहेबआटोळे, कृष्णा गायके, बाबासाहेब मैंद, बाबासाहेब आदबाने आदींची यावेळी उपस्थिती होती.