जालना- गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना केवळ शिक्षाच देणे हा उद्देश नसतो, तर त्यांना केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप व्हावा आणि पुन्हा ते या मार्गाकडे वळू नयेत, म्हणून दिलेली ती शिक्षा असते. या शिक्षेनंतर समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वाईट असतो. त्यामुळे कारागृहातून बाहेर आलेला कैदी सक्षम आणि आत्मनिर्भर बनवा म्हणून कमी कालावधीचेचे व्यवसाय प्रशिक्षण त्याला दिले जाते. अशाप्रकारचे झाडू आणि खराटे बनवण्याचे प्रशिक्षण जालना येथील कारागृहात दिल्या जात आहे. त्यासोबत कैदी आहे म्हणून त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, तो आरोग्याच्या दृष्टीने सक्षम राहावा म्हणून जालना येथील कारागृहात या कैद्यांसाठी पिण्यासाठी स्वच्छ वॉटर प्युरिफायरचे पाणी, आणि अंघोळीसाठी गरम पाणी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शिक्षा भोगत असलेला कैदी, आणि त्याच्या वाट्याला आलेल्या प्रचंड हालअपेष्टा, तुरुंगात होणारा त्याचा छळ असे सर्वसामान्यपणे चित्रपटात कारागृहाचे चित्र असते, मात्र आता कारागृहाचे हे चित्र बदत आहे. कैद्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो स्व:ताच्या पायावर उभा राहावा, त्याला उपजिवीकेचे साधन मिळावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये कैद्यांना झाडू आणि खराटे बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न