महाराष्ट्र

maharashtra

जालन्यात MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी पूर्ण.. कोरोनाची लक्षणे असलेल्या उमेदवारांनाही देता येणार परीक्षा

By

Published : Oct 7, 2020, 8:42 PM IST

जालना जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या रविवारी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या उमेदवारांनाही ही परीक्षा देण्यात येणार आहे. यासाठी आयोगाने वेगळी व्यवस्था केली आहे.

MPSC state service pre-examination
जालन्यात MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी पूर्ण

जालना- परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतरही लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येणार असल्याची व्यवस्था लोकसेवा आयोगाने केली आहे. त्या संदर्भातील पूर्वतयारीसाठी आज कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी आता कोरोनाची काळजी न करता निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी सज्ज राहायला हरकत नाही.

रविवार दिनांक 11 रोजी जालना जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा -2020 ही पार पडणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दोन वेळा प्रशिक्षणही दिले आहे. जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. 2448 उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते त्यापैकी 2442 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी तीन ते सहा या वेळे दरम्यान ही परीक्षा होणार आहे. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून लोकसेवा आयोगाने पुरवठादार नियुक्त केले आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला हात मोजे, सॅनिटायझर, मास्क दिला जाणार आहे. परीक्षा केंद्रात सोडण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यादरम्यान एखाद्या परीक्षार्थीला जर कोरोनाची लक्षणे आढळून आली तर त्याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. या परीक्षार्थीसोबतच त्याच्यावर पर्यवेक्षण करणाऱ्या पर्यवेक्षकला शिपायाला देखील पीपीई किट देण्याची व्यवस्था आयोगाने केली आहे.

जालन्यात MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी पूर्ण

जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवर 125 शासकीय कर्मचारी काम करणार आहेत. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यापासून शिपायापर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार डॉ.प्रशांत पडघन आणि नायब तहसीलदार स्नेहा कुहिरे यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

जालना शहरातील लोकसेवा आयोगाची परीक्षा केंद्रे -
शासकीय तंत्रनिकेतन नागेवाडी, बद्रीनारायण बारवाले कॉलेज औद्योगिक वसाहत, श्री सरस्वती भुवन महाविद्यालय, जुना जालना, सीटीएमके हायस्कूल नवीन जालना, महावीर स्थानकवासी जैन शाळा इंग्रजी माध्यम, सेंट मेरी हायस्कूल देऊळगाव राजा रोड. जे.ई. एस. महाविद्यालय आणि महावीर स्थानकवासी जैन शाळा मराठी माध्यम.

ABOUT THE AUTHOR

...view details