जालना - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या वरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. रावसाहेब दानवे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून, प्रहार संघटनेच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले आहे.
रावसाहेब दानवेंच्या विरोधात 'प्रहार'चे शोले स्टाईल आंदोलन - दानवेंच्या विरोधात 'प्रहार'चे आंदोलन जालना
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या वरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. याचा निषेध करण्यासाठी 'प्रहार'च्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
दानवेंच्या विरोधात 'प्रहार'चे आंदोलन
शुक्रवारी शहरातील नगरपालिकेच्या जलकुंभावर चढत प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान यापूर्वी दानवे यांच्या या वक्तव्याचा प्रहारचे नेते आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाहीर निषेध केला होता. दनवे यांना घरात जाऊन मारावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रीया बच्चू कडू यांनी दिली होती. यानंतर आता प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.