जालना -बदनापूर तालुक्यातील कूसळी येथे आज (शुक्रवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. प्रचंड वारा आणि पावसामुळे कुसळी येथील एका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याचे शेड उडून जाऊन कोंबड्या मृत्यमुखी पडल्या. यामध्ये शेतकऱ्याचे 10 लाख रुपयाचे नुकसान झाले.
बदनापूरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याचे 10 लाखांचे नुकसान - कुक्कुटपालन शेतकऱ्याचे मोठे नुकसान
बदनापूर तालुक्यातील कूसळी येथे आज (शुक्रवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. प्रचंड वारा आणि पावसामुळे कुसळी येथील एका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याचे शेड उडून जाऊन कोंबड्या मृत्यमुखी पडल्या.
कोरोनाचा कहर सुरू असतानाच निसर्गाच्या प्रकोपाने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विष्णू रामभाऊ काकडे असे नुकसान झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. रामभाऊ हे जोडउद्योग म्हणून कुक्कुटपालन करत होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या गट क्रमांक 253मध्ये तीन शेडची उभारणी केलेली होती. कोरोनामुळे मागील 3 महिन्यापासून त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. आधी कोंबडीपासून कोरोना होतो या अफवेने पक्षी विक्रीला प्रचंड झळ बसली. त्यानंतरही मोठ्या उमेदीने त्यांनी अंबड येथून तीन महिन्यांपूर्वी दीड हजार गावरान व दीड हजार बॉयलर जातीचे पक्षी आणून उत्पादन सुरू केले होते.
कोंबड्यांसाठी त्यांनी पत्र्याचे मोठे शेड उभारले होते. या शेडमध्ये गावरान 1 हजार 500 व बॉयलर 1 हजार 500 अशा एकूण 3 हजार कोंबड्या त्यांनी जगवल्या होत्या. या पक्ष्यांना दररोज मोठ्या प्रमाणात खाद्य लागत असायचे. कोंबड्यांचा तीन महिने संभाळ करण्यासाठी जवळपास 10 लाख रुपये खर्च आला होता. सदरील खर्च त्यांनी नातलग, मित्र परिवार तसेच खासगी लोकांकडून तसेच काही व्याजाने पैसे काढून भागवला. आता पक्षी विक्रीजोगे झालेले असतानाच अचानक आलेल्या प्रचंड वाऱ्याने व पावसाने संपूर्ण शेड उडून जाऊन मोठे नुकसान झाले. त्यामध्ये कोंबड्याही मृत्यूमुखी पडल्या आहेत. वाऱ्याचा तडाखा एवढा जोरदार होता, की शेड उडून त्यावरील पत्रे शेतात दूरवर जाऊन पडलेले दिसत होते.