जालना - देशासह राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. यामुळे पोट्री फार्म व्यवसायिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात डबघाईला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाला उभारी देण्यासाठी जालन्यात चिकन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात 60 व्यावसायिक
जालना जिल्ह्यात सुमारे 60 कुकूटपालन व्यवसाय करणारे शेतकरी आणि व्यावसायिक आहेत. मात्र सध्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे हे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ गैरसमज असल्यामुळे लोकांनी चिकन खाणे सोडून दिले आहे, असे मत या व्यवसायिकांचे आहे. त्यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी चिकन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर, डॉमिनोजचे वरिष्ठ व्यवस्थापक हर्षल कौशिक यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिकांनी यावेळी हजेरी लावली.