जालना- इंग्रजांनी भारतावर राज्य करताना अनेक सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यातीलच एक म्हणजे पोस्ट विभाग. या विभागातील महत्त्वाचे कागद म्हणजे पोस्ट कार्ड, हे पोस्ट कार्ड सुरू करून आज म्हणजेच एक जुलै 2019 ला एकशे चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. एक एप्रिल ते 30 जून 2019 दरम्यान 10 हजार पोस्टकार्ड विकले गेले आहेत. त्यामुळे या पोस्ट कार्डचे महत्त्व आजही कायम असल्याचे दिसत आहे. १ जूलै 1889 वर्षी हे पोस्ट कार्ड सुरू करण्यात आले होते.
हॅप्पी बर्थडे 'पोस्ट कार्ड'...झाले 140 वर्षाचे; 'या' वर्षी झाले होते सुरू
एकशे चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पोस्ट कार्ड संबंधी माहिती देण्यासाठी कोणीही हयात नाही, परंतु जे हयात आहेत त्या जाणकारांच्या मते या पोस्ट कार्डची किंमत त्यांना आठवते तसे सुरुवातीला 5 पैसे त्यानंतर 10 पैसे, 15 पैसे, 25 पैसे आणि आज 50 पैसे अशी किंमत झाली आहे.
एकशे चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पोस्ट कार्ड संबंधी माहिती देण्यासाठी कोणीही हयात नाही, परंतु जे हयात आहेत. त्या जाणकारांच्या मते या पोस्ट कार्डची किंमत त्यांना आठवते तसे सुरुवातीला 5 पैसे त्यानंतर 10 पैसे, 15 पैसे, 25 पैसे आणि आज 50 पैसे अशी किंमत झाली आहे. डिजिटलच्या जमान्यात व्हाट्सअॅप, ई-मेल, कुरियर अशा अनेक सुविधा असतानाही पोस्ट कार्डची किंमत मात्र आजही कायम आहे. या पोस्ट कार्डचा वापर बँका आणि वकिली व्यवसाय करणारे वकील मोठ्या प्रमाणात करतात. एखाद्याला नोटीस पाठवताना त्यासोबत हे पोस्टकार्ड जोडले जाते आणि त्यावर संबंधितांना नोटीस मिळाल्यानंतर त्याची सही घेऊन हे पोस्ट कार्ड परत नोटीस पाठवणाऱयाला मिळते. त्यामुळे हे पोस्ट कार्ड म्हणजे एक महत्त्वाची पोहच पावतीच आहे. हा कागद सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हाताळला जात असल्यामुळे त्याची विश्वासहर्ता आजही कायम आहे. कारण दिल्या-घेतल्याचा पोस्टाचा शिक्का अद्वितीय आहे.
जालना जिल्ह्यात मुख्य पोस्ट ऑफीस आहे. त्याअंतर्गत 28 पोस्ट ऑफिस आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आणि बनोटी, अजिंठा, फरदापूर या पोस्ट ऑफिसचा समावेश आहे. ग्रामीण भागात 236 आणि शहरी भागात 89 असे 325 पोस्ट ऑफिस सध्या असून, त्यामध्ये 236 कर्मचारी काम करत आहेत. जालना शहरात 28 पत्रपेटी असून सुट्टीचे दिवस वगळता त्या रोज सकाळ संध्याकाळ उघडल्या जातात.