जालना - महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण करण्यात येते.
बदनापुरातील क्वारंटाइन सेंटरमध्ये नागरिकांचे हाल; निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याची तक्रार - corona in jalna
महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण करण्यात येते. मात्र, या ठिकाणी अलगीकरण केलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.
बदनापूर येथे सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये सध्या १४ संशयित रुग्ण आहेत. मात्र, त्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने या क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
बदनापूर येथील मुलींच्या वसतिगृहात क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले. संबंधित वसतीगृह शासकीय आहे. या ठिकाणी १४ संशयित कोरोनाबाधितांचे अलगणीकरण केले आहे. शासनाने योग्य अन्नपाण्याची सोय करणे आवश्यक आहे. मात्र, या नागरिकांची हेळसांड होत असल्याचे समोर आले. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने या व्यक्तींनी तक्रार केली. परंतु, तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने लोकांमध्ये संताप आहे.