जालना -कोरोनासारख्या महामारीच्या कार्यकाळात भर रस्त्यात उभे राहून जीवाची परवा न करणाऱ्या 756 पोलिसांन 13 लाख 82 हजार 400 रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून पोलीस प्रशासनाने कर्मचार्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी हे रोख स्वरूपातील बक्षीस दिले आहे.
मागील 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेले कर्मचारी हे रस्त्यावर उभे आहेत आणि त्यामुळेच सामान्य जनता शांतपणे घरात बसू शकते. म्हणून अशा पोलिसांना पोलीस अधीक्षक एस .चैतन्य यांनी हे प्रोत्साहनपर रोख रक्कम देऊन मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. जालना शहरात येणाऱ्या विविध चेकपोस्टवर अनेक पोलीस कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते. अशा कर्मचाऱ्यांना 100 रुपये प्रतिदिन असे हे बक्षीस देण्यात येणार आहे. तर उर्वरित बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अशाच प्रकारच्या बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
756 कर्मचारी पुढील प्रमाणे-