महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पासोडीत गांजा शेतीवर पोलिसांचा छापा, 19 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त - police

जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी येथे शेतामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केलेल्या शेतात छापा टाकूल 1 क्विंटल 97 किलो वजनाचा 19 लाख 70 हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलिस पथक

By

Published : Oct 18, 2019, 10:46 AM IST

जालना- जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी येथे शिवरात गांजाच्या झाडांची अवैद्यरित्या तस्करी करण्याच्या उद्देशाने शेतामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केलेल्या शेतात छापा टाकूल 1 क्विंटल 97 किलो वजनाचा 19 लाख 70 हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्या पथकाने छापा टाकून वेगवेगळ्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. वेगवेगळ्या शेतामधून सर्व झाडे पथकाने कायदेशीर कडक कारवाई करत मोठी ओलसर हिरव्या रंगाची 178 एकूण झाडे ताब्यात घेतली. त्याचे वजन केले असता एकूण 1 क्विंटल 97 किलो वजनाची भरली. 19 लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून सर्व मुद्देमाल व एका अरोपीस ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - जालना : वरुडी फाट्यावरून 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त

शेतीमालक भालचंद्र हरचंद्र काकरवाल (रा. पासोडी ता. जाफ्राबाद) व फरारी आरोपी विरोधात जाफ्राबाद पोलीस ठाण्यात रितसर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश पायघन, सागर देवकर, रामेश्वर सिनकर, जगदीश बावने, नीलेश फुसे, गनपत बनसोडे, ईश्वर देशपांडे, राजू डोईफोडे, नरहरी खरडे, आधार भिसे, उमेश टेकाले, शाबान तड़वी, गजानन भूतेकर, चालक धौंडगे, म्हस्के, कृषि विभागाचे सिताफळे, महसूल विभागाचे शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - बदनापुरात भिंत कोसळून एक ठार

ABOUT THE AUTHOR

...view details