बदनापूर (जालना) - राजेवाडी शिवारात घरफोडी करुन ४ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने व १२ हजार रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपींचा बदनापूर पोलिसांनी छडा लावून आरोपींकडून संपूर्ण मुददेमाल जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारास पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या उपस्थित सुपूर्द करण्यात आला. सात-आठ महिन्यांत चोरी गेलेला मुददेमाल तक्रारदारास मिळाल्याबददल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
चोरी गेलेला साडेचार लाखाचा मुद्देमाल पोलिसानी दिला परत मिळवून - बदनापूर पोलीस
राजेवाडी येथील रणजित अंबरसिंग घुसिंगे यांच्या घरी २६ फेब्रुवारी २०२० ला रात्री घरफोडी करून चोरट्यांनी ४ लक्ष ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १२ हजार रुपये रोख असे जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुददेमाल चोरून नेला होता. या बाबत घुसिंगे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली होती. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी या प्रकरणी सखोल तपास करण्यासाठी पथकांची नेमणूक करून सदर तपास सह पोलीस निरीक्षक शाहूराज भिमाळे यांच्याकडे दिला होता.
तालुक्यातील राजेवाडी येथील रणजित अंबरसिंग घुसिंगे यांच्या घरी २६ फेब्रुवारी २०२० ला रात्री घरफोडी करून चोरट्यांनी ४ लक्ष ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १२ हजार रुपये रोख असे जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुददेमाल चोरून नेला होता. या बाबत घुसिंगे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली होती. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी या प्रकरणी सखोल तपास करण्यासाठी पथकांची नेमणूक करून सदर तपास सह पोलीस निरीक्षक शाहूराज भिमाळे यांच्याकडे दिला होता.
या पथकाने पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर, बदनापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. या पथकामध्ये भिमाळे यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील, कमालाकर अंभोरे, धनसिंग जारवाल, गजानन जारवाल, विजय राठोड, रमेश चव्हाण, चरणसिंग बमनावत यांनी तपास करून सदर घरफोडीत आरोपी निष्पन्न करून आरोपीस अटक करून संपूर्ण मुददेमाल हस्तगत केला होता. दरम्यान बदनापूर न्यायालयाने आदेश देऊन सदरील मुददेमाल फिर्यादीस देण्याचे सांगण्यात आल्यानंतर आज (दि. १७ ऑक्टोबर) पोलीस निरीक्षक खेडकर व इतरांच्या उपस्थितीत तक्रारदार रणजित घुसिंगे यांना १४ तोळयाचे सोन्याचे दागिने व रोख १२ हजार रुपये असा एकूण ४ लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जसेच्या तसे परत करण्यात आले. अवघ्या सात ते आठ महिन्यांत बदनापूर पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमालही तक्रारदारास मिळवून दिल्याबददल जनमानसात पोलिसांचे कौतुक होत आहे.