जालना -औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या वरद फर्टिलायझर या खत कारखान्यावर कृषी विभागाच्या वतीने १२३०० पोती खत साठा जप्त करणयात आला आहे. या खत साठ्याचे बाजार मूल्य ८०लाख रुपये आहे. या प्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यातगुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरद फर्टिलायझरच्या खत कारखान्यावर छापा, डॉ. निम नावाच्या बनावट खताचा ८०लाखांचा साठा जप्त
"वरदची दृष्टी, हिरवीगार सृष्टी" हे ब्रीदवाक्य घेऊन डॉ. निम या नावाने निंबोळी युक्त खत तयार केल्याचे भासवून हे खत ऊस, मोसंबी, डाळिंब, टमाटर, आद्रक, मका, कापूस, या सर्व पिकांना उपयुक्त असल्याचा दावा कंपनीने या पोत्यावर लिहून केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या खताची गुणवत्ता अधिकाऱ्यांनी तपासली असता मातीमिश्रित निंबोळीचा गंध येत असलेले हे बनावट खत असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक एस. व्ही. माईनकर यांनी वर्तवला आहे.
"वरदची दृष्टी, हिरवीगार सृष्टी" हे ब्रीदवाक्य घेऊन डॉ. निम या नावाने निंबोळी युक्त खत तयार केल्याचे भासवून हे खत ऊस, मोसंबी, डाळिंब, टमाटर, आद्रक, मका, कापूस, या सर्व पिकांना उपयुक्त असल्याचा दावा कंपनीने या पोत्यावर लिहून केला आहे. बाजार मूल्या नुसार एका पोत्यावर सातशे वीस रुपये छापील किंमत आहे. मात्र, प्रत्यक्षात या खताची गुणवत्ता अधिकाऱ्यांनी तपासली असता मातीमिश्रित निंबोळीचा गंध येत असलेले हे बनावट खत असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक एस. व्ही. माईनकर यांनी वर्तवला आहे.
दरम्यान प्रत्येकी ४० किलो वजनाच्या १२३०० खताच्या बॅग या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. या खताचे बाजार मूल्य सुमारे ८० लाखाच्या जवळपास आहे. यापूर्वी उत्पादन केलेल्या आणि विक्री केलेल्या खताची माहिती पोलीस तपासात पुढे येईल आणि या रकमेमध्ये वाढ होईल, अशी माहितीही माईनकर यांनी दिली.