जालना - तालुक्यातील उटवद शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत सात मोटरसायकल, आठ मोबाईल आणि रोख 49 हजार रुपये, असा एकूण सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नऊ जणांना ताब्याच घेण्यात आले आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नऊ जणांना अटक - पोलिसांची धाड
पोलिसांना जालना-मंठा महामार्गावर हॉटेल जय भारतजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संबंधीत ठिकाणी छापा मारला.
हेही वाचा...मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले 168.09 कोटी!
पोलिसांना जालना-मंठा महामार्गावर हॉटेल जय भारतच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संबंधीत ठिकाणी छापा मारला. या छाप्यामध्ये धाबा मालक दीपक भास्कर जभोरे (35 रा.उटवद) शिवाजी पुंजाराम खोमणे (30 रा हतवन) बाबासाहेब रंगनाथ रंधवे (38) संजय रामदास ढोकळे (20) साहेबराव अण्णाभाऊ धुमाळ (35) ज्ञानदेव रंगनाथ भांदर्गे (37) गुंडाप्पा बाबुराव कुंडेकर (50) संतोष विश्वनाथ इनकर आणि सचिन बाबुराव सावंत (32) अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.