जालना -एका महाविद्यालयीन तरुणाला गावठी पिस्तुल जवळ बाळगल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे. एडीएस पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विद्यार्थ्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. त्याने सोशल मीडियावर टाकलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
जालन्यात विद्यार्थ्याकडून पिस्तुल हस्तगत... हेही वाचा... शेजाऱ्याने पळवली शेजारीण; समजूत काढताना पोलिसांसह दोघांचेही कुटुंबीय झाले हैराण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबरला एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, ऋषीकेश राजू जऊळकर याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असून, ते घेऊन तो संभाजीनगरहून बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथे जात आहे. पोलिसांना अशी माहिती समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. ऋषीकेश हा शेंद्रा एमआयडीसीतील गंगापूर जहाँगीर अष्टविनायक वसाहत येथील खाटीक गल्लीजवळून पायी जाताना दिसला. तेव्हा पोलिसांनी त्याला तेथेच अटक केली.
हेही वाचा... महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्य घोषित करा; शिवसेनेचे संसदेबाहेर आंदोलन
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल, मॅगझीन यासह ४० हजार रुपये मिळाले. आरोपी ऋषीकेशची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदुक मित्राची असून आपण ती देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या मित्राचा शोध घेतला असता तो पोलिसांच्या हाती आला नाही. समाज माध्यमांवर पसरलेल्या फोटोंवरून तपास घेत अखेर पोलिसांनी या विद्यार्थ्याला अटक केली.