जालना- सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन नऊ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून बिअरच्या बाटल्या, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण उच्चभ्रू घराण्यातील तरुण आहेत.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, उच्चभ्रू घराण्यातील तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - सदर बाजार पोलीस
शहरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन नऊ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून बिअरच्या बाटल्या, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर बाजार पोलीस ठाणे
या जुगाऱ्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, यासह बिअरच्या 12 बॉटल, एक बॉक्स असा एकूण सुमारे 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणे, कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार होण्यासारखी परिस्थिती असताना तोंडाला मास्क न लावणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेले हे नऊ तरुण उच्चभ्रु घराण्यातील असल्यामुळे याविषयी चर्चा रंगली आहे.