महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळू तस्करांवर पोलिसांचा छापा... 36 लाखांचा मुद्देमाल जप्त - जालना बातमी

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

police-action-on-sand-mining-in-jalna
वाळू तस्करांवर पोलिसांचा छापा...

By

Published : Feb 25, 2020, 2:12 PM IST

जालना- जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एक जेसीबी, एक टिप्पर असा 36 लाख 3 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाळू तस्करांवर पोलिसांचा छापा...

हेही वाचा-लोकशाही धोक्यात आणू नका, 'या' मुद्द्यावर अण्णांनी सरकारचे खेचले कान

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यात अवैध वाळू उपसण्यासाठी वापसण्यात येणारे जेसीबी व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे टिप्पर पोलिसांनी जप्त केले आहे. हा एकुण 36 लाख 3 हजार रुपयाचा मुद्देमाल आहे.

याप्रकरणी गणेश किसन वनारसे, (फत्तेपूर जोमाला), पप्पू मधुकर ठोंबरे (जवखेडा) यांच्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जालना जिल्हा अधीक्षक एस चैतन्य, अप्पर पोलीस अधिकारी समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप उगले, विजय जाधव, गणेश निकम यांनी केली आहे. याप्रकरणी संदीप उगले अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details