जालना -शहराला पाणीपुरवठा करणारी जायकवाडी-अंबड-जालना पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी पैठणजवळ फुटली आहे. त्यामुळे जालना शहराचा पाणीपुरवठा चार दिवस लांबणीवर पडणार आहे.
पैठणजवळ जलवाहिनी फुटली; जालन्याला ४ दिवस राहणार टंचाई
जुन्या जालनासाठी जायकवाडी येथील पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. ही जलवाहिनी आज (बुधवारी) पैठणजवळ फुटली.
जुन्या जालनासाठी जायकवाडी येथील पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. याच जलवाहिनीवर अंबड शहरदेखील अवलंबून आहे. मात्र, आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास पैठणपासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर ही जलवाहिनी फुटली. दरम्यान, रस्त्याचे काम करत असताना जेसीबीमुळे ही जलवाहिनी फुटली असल्याचे जालना नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे. पैठणपासून जालन्यापर्यंत या जलवाहिनीतून पूर्णपणे पाणी भरलेले आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे कारंजे सुमारे पन्नास फूट उंचीपर्यंत उडत आहेत.
जोपर्यंत ही जलवाहिनी रिकामी होत नाही ही तोपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेता येत नाही. दुरुस्तीचे काम हाती घेतानादेखील जलवाहिनीच्या बाजूला साचलेल्या पाण्यामुळे ते काम कधी सुरू होईल, हेदेखील सांगता येत नाही. एकंदरीत जुन्या जालन्यासाठी नियमित होणारा पाणीपुरवठा निर्धारित वेळेपेक्षा चार दिवस पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती जालना नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता बगळे यांनी दिली आहे.