महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणी टंचाईने नागरिकांचे हाल; नळ योजना सुरू करण्याची नागरिकांची मागणी

मार्च महिन्यात प्रचंड उकाडा वाढल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून बोर कोरडे झाले आहेत. शहरातील आनंदनगर, सत्यनारायण नगर वस्ती जालना औरंगाबाद महामार्गावर २००६मध्ये झाली. या वस्तीत जवळपास ५० घरे आहेत. मात्र या भागात सार्वजनिक नळयोजना सुरू झाली नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

bad
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना नागरिक

By

Published : May 15, 2020, 5:08 PM IST

जालना- शहरातील आनंदनगर व सत्यनारायण नगर भागात पाणी टंचाई जाणवत आहे. मार्च महिन्यात प्रचंड उकाडा वाढल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून बोर कोरडे झाले आहेत. आनंदनगर व सत्यनारायण नगर या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने या भागात नगर पंचायतने नळयोजना सुरू करण्याची मागणी नागरिकांनी नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्याकडे केली आहे.

बदनापूर शहरातील आनंदनगर, सत्यनारायणनगर वस्ती जालना औरंगाबाद महामार्गावर २००६मध्ये झाली. या वस्तीत जवळपास ५० घरे आहेत. मात्र या भागात सार्वजनिक नळयोजना सुरू झालेली नसल्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरात बोर घेतलेले आहेत. परंतु सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे बोर कोरडे झाल्याने नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्यावर्षी नगर पंचायतने या भागात एक बोर घेऊन पाणी व्यवस्था केली होती, मात्र यंदा तो बोर देखील कोरडा पडला आहे.

या भागातील नगरसेविकेने निवडून येताच सोमठाणा बदनापूर सार्वजनिक नळयोजनामधून पाणी उपलब्ध करुन देण्याचे अश्वासन दिले होते. मात्र पाच वर्ष उलटले तरी सदर नगरसेविकेने या भागात चुकून देखील बघितले नाही. आनंदनगर व सत्यनारायण नगरमध्ये जवळपास ५० घरे असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहेत. या भागात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांना पुंडलिक घोडके, आर. के. पडूळ, कैलास खडे, आकाश होरशीलसह नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details