जालना -मला काळजी करण्याचे कारण नाही. सर्वच तांड्यामध्ये कमळाचे फूल उमलणार आहे. कारण मी सर्वच तांड्यांवर पैसे दिले आहेत, असे वक्तव्य परतूरचे विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'मी सर्वच तांड्यांवर पैसे दिले.. मला काळजीचे कारण नाही' - परतूर मतदारसंघातील युतीचे उमेदवार
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा बबनराव लोणीकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये आपण सर्व तांड्यावर पैसे दिले असल्याचे लोणीकर बोलत आहेत.
बबनराव लोणीकर
लोणीकरांनी मात्र अशा प्रकारच्या व्हिडिओचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे. ग्रामीण भागातील जनतेला 'निधी' ऐवजी 'पैसा' हा शब्द लवकर समजतो. त्यामुळे आपण बोललो असल्याचा खुलासा लोणीकर यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार होतच असतात. या व्हिडिओशी माझे काहीही देणे-घेणे नसल्याचे लोणीकर म्हणाले.
Last Updated : Oct 17, 2019, 4:23 PM IST