जालना -महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची सांस्कृतिक जडणघडण वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी शिवगान स्पर्धा उपयोगी ठरेल, असे मत उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी व्यक्त केले.
भाजपा सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजन-
भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख शुभांगी देशपांडे यांच्या पुढाकारातून आज शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आद्य नाट्यशास्त्रज्ञ भरतमुनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेलचे मराठवाडा संयोजक गजानन जोशी, तुळशेज चौधरी, सिद्धिविनायक मुळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषा पवार, संस्कृत विभागाच्या अध्यक्ष शुभांगी देशपांडे यांची उपस्थिती होती.
सांस्कृतिक वारसा जपायला हवा-