महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हळद लागण्यापूर्वीच नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - sandeep pawar

सततची नापिकी आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून या तरुणाने मानेगाव तांडा येथे आत्महत्या केली. ४ एप्रिलला या तरुणाचे लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By

Published : Apr 2, 2019, 12:47 PM IST

जालना - नापिकीला कंटाळून जालना तालुक्यातील मानेगाव तांडा येथील युवा शेतकऱ्याने हळद लागण्यापूर्वीच आपले जीवन संपविले. संदीप लहू पवार (वय 29) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुणाचे ४ एप्रिल रोजी लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळीच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे. सततची नापिकी आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून या तरुणाने मानेगाव तांडा येथे आत्महत्या केली. ४ एप्रिलला या तरुणाचे लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती भोजपुरी पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.


सोमवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घरातील मंडळी उठल्यानंतर संदीप पवार देखील उठून बाहेर जाऊन आला दरम्यानच्या काळात घरातील मंडळींना संदीपच्या खोलीचा दरवाजा बराच काळ बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी आवाज दिल्यानंतरही दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. त्यावेळी संदीप घरात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

ABOUT THE AUTHOR

...view details