जालना -जर रात्री-अपरात्री दाराच्या फटीतून दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहिले तर वेगळीच शिक्षा होणार आहे. यासाठी एक वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड भरावा लागेल. ही शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील गंगाधरराव वेदपाठक यांनी दिली आहे. याप्रकरणातील जाफराबाद येथील 40 वर्षीय आरोपीने फिर्यादीच्या घराच्या दरवाज्याच्या फटीतून डोकावून पहात असल्याचा आरोप यातील फिर्यादीने केला होता.
सावधान! रात्री अपरात्री दुसऱ्याच्या घरात दाराच्या फटीतून डोकावून पाहाल, तर.. - district and session court jalna
दिनांक 20 मे 2015 यादिवशी यातील फिर्यादी ही तिच्या मुलासह अंगणात बाहेर झोपलेली होती. तिच्या तरुण अविवाहित मुली घरात झोपलेल्या होत्या. यातील आरोपीने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन दरवाज्याच्या फटीतून फिर्यादीच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहिले.
दिनांक 20 मे 2015 यादिवशी यातील फिर्यादी ही तिच्या मुलासह अंगणात बाहेर झोपलेली होती. तिच्या तरुण अविवाहित मुली घरात झोपलेल्या होत्या. यातील आरोपीने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन दरवाज्याच्या फटीतून फिर्यादीच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहिले. यानंतर दाराच्या फटीतून हात घालून दरवाजाची कडी काढण्याचा प्रयत्न केला. तसेच यापूर्वी देखील या आरोपीने अनेक वेळा खिडकीतून आणि दाराच्या फटीतून डोकावून पाहून फिर्यादीच्या मुलीचा पाठलागदेखील केला होता.
याप्रकरणी फिर्यादीने जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. या प्रकरणाचा निकाल सोमवारी पाच वर्षांनी लागला. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गंगाधरराव वेदपाठक यांनी आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. आरोपीने हा दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षा ही न्यायालयाने सुनावली आहे. आरोपीच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील वाल्मीक घुगे यांनी काम पाहिले.