महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Four drown in farm lake : शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; पोहण्यासाठी गेले असता घडली घटना - दुर्दैवी घटना

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांसह एकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जालना तालुक्यातील सामनगाव येथे आज दुपारच्‍या सुमारास घडली आहे. चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेनंतर गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Three children drown in farm
शेततळ्यात बुडून चार जणांचा मृत्यू

By

Published : Jun 6, 2023, 7:41 PM IST

Updated : Jun 6, 2023, 8:56 PM IST

जालना : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांसह एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना तालुक्यातील सामनगाव येथे घडली. ओमकार कृष्णा पडूळ (6 वर्ष), भागवत कृष्णा पडूळ (9 वर्ष), युवराज भागवत इंगळे 5 वर्ष तर भागवत जगन्नाथ ( 32 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. भागवत जगन्नाथ हा शेततळ्यात मालकाची दोन मुले आणि त्याचा एक मुलगा घेऊन पोहण्यासाठी गेला होता. मात्र मुले पाण्यात बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी गेला असता त्याचाही बुडून मृत्यू झाला.

परिसरात हळहळ: घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस आणि अग्निशनमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर चौघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्या नंतर गाव तसेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातही अशीच घडना : जालना शहरात एप्रिल, 2022 मधे अशीच घटना घडली होती. जालना शहरातील मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी एका १४ वर्षीय मुलासह बापाचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. माणिक निर्वंळ व त्यांचा १४ वर्षांचा मुलगा आकाश तीन नातेवाईकासह मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी गेले होते. पोहताना मुलगा बुडत असल्याचे पाहून माणिक निर्वंळ यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलावात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे बाप-लेक बुडाले होते.

अशी घडली घटना: सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील पनुब्रे, वारूण या गावातील 30 ते 40 तरुण 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी गुरुवारी रांगणा किल्ल्यावर गेले होते. दिवसभर गडावरील स्वच्छता करून पुन्हा परत यायचे असे नियोजन होते. सर्वांनी स्वच्छता केली. त्यानंतर यातीलच 19 वर्षीय ओंकार हा येथील तलावाची स्वच्छता करून त्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र अचनाक बुडाला. सोबत आलेल्या मित्रांनी शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो सापडला नाही.

हेही वाचा -

  1. Two children drown in farm शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू धायरीतील घटना
  2. Children Drowned in Lake खेळताखेळता शेततळ्यातील पाण्यात उतरले बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू
  3. Five Children Died due to Drowning शेततळ्यात अंघोळीसाठी उतरलेल्या दोन मुली तीन मुलांचा मृत्यू बुडून मृत्यू
Last Updated : Jun 6, 2023, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details