जालना - परतूर तालुक्यातील शिरोडा या गावच्या महिलेने दाढ दुखीच्या कारणामुळे विविध रुग्णालयात उपचार घेतले. यानंतर महिलेला १३ एप्रिलला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आता उपचारानंतर तिचे दोन्ही कोरोना अहवाल सलग निगेटिव्ह आल्यामुळे आज या महिलेला सुट्टी देण्यात आली आहे.
जालन्यातील महिला कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाली सुट्टी - corona cases in jalna
परतूर तालुक्यातील शिरोडा या गावच्या महिलेने दाढ दुखीच्या कारणामुळे विविध रुग्णालयात उपचार घेतले. यानंतर महिलेला १३ एप्रिलला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, उपचारानंतर महिलेचे दोन्ही अहवाल सलग निगेटिव्ह आल्यामुळे आज या महिलेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जालन्यातील महिला झाली कोरोनामुक्त
महिलेला रुग्णालयातून सुट्टी देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुलकर्णी यांच्यासह उपचार करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टर उपस्थित होते. महिलेला निरोप देताना पुष्पगुच्छ न भेटल्यामुळे परिसरातच असलेल्या सदाफुलीच्या फुलांचा पुष्पगुच्छ तयार करून महिलेला भेट देण्यात आले.
Last Updated : Apr 29, 2020, 5:48 PM IST