जालना -यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड तालुक्यातील भांडोला येथील तिघे जण इंडिका कारने पुण्याकडे जात असताना बदनापूरजवळ अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला. दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी औरंगाबाद शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बदनापूरजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर २ गंभीर जखमी - jalna news update
इंडिका कारने पुण्याकडे जात असताना बदनापूरजवळ अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला. दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड तालुक्यातील भांडोला येथील शेख इम्रान, विजय गोविंद जाधव व देवानंद जाधव हे तिघे जण 16 मे रोजी रात्री सिंहगडकडे जाण्यासाठी इंडिका कार क्रमांक एम एच 12 एम ई 2283 ने निघाले होते. पहाटे 2:30 ते 2:45 दरम्यान मार्ग बदनापूरजवळ पोहोचले. मात्र, पहाटे चालकास झोप येत असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार वरुडी शिवारात डाव्या बाजूला खड्डयात जाऊन एका झाडाला धडकली. कारमधील इम्रान शेख हा जागीच मरण पावला तर विजय जाधव व देवानंद जाधव हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमाळे, बीट जमादार नितीन धीलपे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले व घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई केली.