जालना - लॉकडाऊनच्या काळात अनेक गरिबांना धान्य मिळत नाही. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी काही संस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोलपंप असोसिएशनच्यावतीने 100 आणि किशोर अग्रवाल या उद्योजकाच्यावतीने अन्नधान्याच्या 50 किट जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
पोलीस अधिकार्याच्या आवाहनाला प्रतिसाद; पेट्रोल असोसिएशनने दिल्या अन्नधान्याच्या शंभर किट - जीवनावश्यक वस्तू
जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी काही संस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोल असोसिएशनच्यावतीने 100 आणि किशोर अग्रवाल या उद्योजकाच्या वतीने अन्नधान्याच्या 50 किट जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
पेट्रोल असोसिएशन
पुढील पंधरा दिवस पुरेसे होईल एवढे अन्नधान्य या किटमध्ये आहे. गहू , तांदूळ, तेल, तूर डाळ ,साखर, दैनंदिन लागणाऱ्या वस्तू देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या कुटुंबांना खरोखरच गरज आहे, अशांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केले आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगार कुटुंबाच्या खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. विविध क्षेत्रांतील नागरिक आपापल्या परीने या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.