महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

accident Jalna Samrudhi Highway : जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एक जण ठार - accident Prosperity Highway

समृध्दी महामार्ग ( accident Prosperity Highway) वाहतुकीसाठी खुला झाला नसला तरी नागरिक त्यावरून भरधाव वाहने नेत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि.१२) दुपारी चार वाजेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात एक भरधाव कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातात एकजण ठार ( One died in an accident) झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

Terrible accident on Jalna Samrudhi Highway
जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

By

Published : Jun 13, 2022, 1:32 PM IST

जालना -समृध्दी महामार्ग ( accident Prosperity Highway) वाहतुकीसाठी खुला झाला नसला तरी नागरिक त्यावरून भरधाव वाहने नेत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि.१२) दुपारी चार वाजेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात एक भरधाव कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातात एकजण ठार ( One died in an accident on Jalna Samrudhi Highway ) झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी ( Both seriously injured ) झाले. बळीराम सखाराम खोकले (४५, रा. मेहकर, जि.बुलडाणा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर येथील बळीराम खोकले, (४५) चंद्रकांत सीताराम साबळे, (४३) सुनील श्रीराम लिंबेकर (४५) हे कारने (क्र. एमएच २८, बीके ३१००) औरंगाबादहून मेहकरकडे जात होते.

तांदुळवाडी शिवारात रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातात कारमधील बळीराम खोकले यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे सहायक निरीक्षक साळवे, कर्मचारी एस.बी. उबाळे, के.एम. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details