बदनापूर (जालना)बदनापूर शहरालगत असलेल्या दुधना नदीच्या पुलावरून टेम्पो कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान टेम्पो चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे.
चालकाचा मृत्यू
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रिकाम्या बिअरच्या बाटल्या घेऊन, अपघातग्रस्त टेम्पो नांदेडहून मुंबईकडे चालला होता. पहाटे पाचच्या दरम्यान हा टेम्पो बदनापूर परिसरात आला. मात्र याच वेळी चालकाला झोप लागल्याने टेम्पो पुलावरून नदीत कोसळला. या अपघातात टेम्पो चालक चांद बेग कडू बेग (वय 46 रा. नायगाव सावंगी जिल्हा औरंगाबाद) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, त्यांचा मुलगा वाहेद बेग हा जखमी झाला आहे.