महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - जालना जिल्हा बातमी

भोकरदन तालुक्यातील सुरंगळी पाटीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

बालाजी बावस्कर
बालाजी बावस्कर

By

Published : Jan 31, 2021, 7:33 PM IST

भोकरदन (जालना) -तालुक्यातील सुरंगळी पाटी जवळील देहेड शिवारात दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

बालाजी समाधान बावस्कर (वय 29 वर्षे, रा. देहेड), असे मृत व्यक्तीचे नाव असून सुधाकर एकनाथ दळवी व माणिक एकनाथ दळवी (दोघे, रा. मनापूर, ता. भोकरदन), असे गंभीर जखमी असल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बालाजी हा भोकरदन येथील एका पेट्रोल पंपावर कामला आहे. काम संपवून तो देहेड येथे स्वतःच्या घरी निघाला होता. सुरंगळी पाटीजवळ समोरून सुधाकर व माणिक दळवी हे त्यांच्या दुचाकीवरुन येत होते. त्यावेळी दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात तिघेही जखमी झाले होते. जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना बालाजीचा वाटेतच मृत्यू झाला. तर सुधाकर व एकनाथ दळवी यांच्यावर औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -जालन्यात १३ क्विंटल गौण खनिज जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details