महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदनापुरात भिंत कोसळून एक ठार

बदनापूर तालुक्यातील रमदुलवाडी येथे आज (रविवार) पहाटे साडेचारच्या दरम्यान भिंत कोसळून एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहे.

मृत शोभाबाई

By

Published : Oct 13, 2019, 8:20 PM IST

जालना- बदनापूर तालुक्यातील रमदुलवाडी येथे आज (रविवार) पहाटे साडेचारच्या दरम्यान भिंत कोसळून भावजयीकडे भेटण्यासाठी गेलेल्या बदनापूर येथील शोभाबाई रविंन्द्र आर्सुड (वय 55 वर्षे) या दुर्घटनेत मृत झाल्या आहेत.

हेही वाचा - उल्लेखनीय..! वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाचनालयास पुस्तके भेट


या घटनेत निमाबाई घोरपडे (वय 50 वर्षे), लताबाई घोरपडे (वय 30 वर्षे) या सासू-सुना दोघी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपाचार चालू आहे. त्यातील निमाबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात पोलिसांचे पथसंचलन

ABOUT THE AUTHOR

...view details