जालना - औरंगाबादमधील शेकटा फाट्याजवळ रिक्षा आणि चारचाकीच्या अपघातात जालन्यातील मोतीबागजवळ, संजय नगर भागात राहणाऱ्या दिनेश जाधव यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला असून चारचाकी चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे संजय नगर भागात शोककळा पसरली आहे.
त्याचावर होती परिवाराची जवाबदारी...पण काळानं घातला घाला; एकाच कुटुंबातील ५ जण ठार - जाधव कुटुंबीयांच्या घराबाहेरील दृष्ये
जालन्यातील एका संयुक्त कुटुंबाची जवाबदारी दिनेश जाधव यांच्यावर होती. तेच घराचे पालन-पोषण करत होते. दरम्यान, एका अपघातात त्यांच्यासह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोबतच चारचाकी चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.
एकत्रित कुटुंबात राहणारे गणेश जाधव, रमेश जाधव आणि दिनेश जाधव हे तिघे सख्खे भाऊ. पैकी, गणेश जाधव यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. तर, रमेश जाधव दिव्यांग आहेत. दरम्यान, दिनेश जाधव रिक्षामधून औरंगाबाद येथील एका धार्मिक कार्यक्रमाला जात होते. यावेळी दिनेश जाधव (वय, 35), त्यांची पत्नी रेणुका जाधव (वय, 30), त्यांचा मुलगा अतुल जाधव (वय, 6), वंदना गणेश जाधव, सोहम गणेश जाधव असे एकाच कुटुंबातील ५ जण होते. दरम्यान, या अपघातात या ५ जणांसह चारचाकी चालकावर देखील काळाने घाला घातला आहे. यामुळे या अपघातात एकून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संजय नगर परिसरामध्ये सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले आहे.
हेही वाचा -सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी