जालना - भोकरदन तालुक्यातील भायडी गावाजवळील मुख्य मार्गाने जात असलेल्या धावत्या कारने पेट घेतला. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. धावडा परिसरात असलेल्या विझोरा येथील प्रकाश गावंडे हे औरंगाबादला जात होते. मात्र, दुपारी एक वाजेच्या दरम्यान तालुक्यातील भायडी गावाजवळ स्विफ्ट कारला अचानक आग लागली त्यात चालक हा कार मध्ये एकटाच असल्याने ताबडतोब वाहनाच्या बाहेर आला.
हेही वाचा - हिंगोलीत अज्ञातांनी फोडल्या बसच्या काचा; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल