मुंबई/जालना- आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुढे ढकल्याचे त्यांनी न्यासा या संस्थेवर परीक्षा रद्द होण्याचे खापर फोडले आहे. न्यासाही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सरकारच्या या गोधळाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
न्यासाने घातला तांत्रिक गोंधळ-
आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित केली. परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षा केंद्र जाहीर केले. परीक्षेच्या आदल्या दिवशीच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन ओळखपत्र डाऊनलोड करुन घेताना अडचण येत होती. तर अनेकांना इ-मेलवर चुकीचे ओळखपत्र आले होते. हॉल तिकीटमध्ये संबंधित एजन्सीने गोंधळ घातला होता. विद्यार्थ्यांना या तांत्रिक अडचणींमुळे होणाऱ्या त्रासामुळे ही घातलेल्या गोंधळामुळे अखेर ही परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली - आरोग्यमंत्री राजेश टोपे
न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून आरोग्य मंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. परीक्षांची तारीख येत्या आठ ते दहा दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले. परीक्षेची जबाबदारी न्यासाची असताना देखील त्यांना टार्गेट देऊनही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही. सेलूतील काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळून आल्याचेही टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या 6 हजार 200 जागांसाठी या परीक्षा होणार होत्या. मात्र न्यासाकडे परीक्षेची सर्व जबाबदारी असताना न्यासा जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम ठरली असे सांगायलाही टोपे विसरले नाहीत.