जालना -प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीने आहेत. आपल्या कर्तृत्वातून त्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. जालन्याच्या आनंदी खाडे याही त्यापैकी एक आहेत. आनंदी यांनी 1986 ला 'आशा' इन्स्टिट्युट सुरू केली. मात्र, संस्था नावारुपाला येत असताना इतर मुलींप्रमाणे त्यांच्याही घरी लग्नाबाबत चर्चा होऊ लागली. सुब्रह्मण्यम अय्यर या तरुणासोबत आनंदी खाडे यांचा विवाह झाला. मात्र, कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी आपल्या आशा इन्स्टिट्यूटचा कारभार आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालही चालू ठेवली.
#महिला दिन विशेष : जालन्यातील आनंदी अय्यर यांचा प्रेरणादायी प्रवास हेही वाचा....महिला दिन विशेष : स्त्रीरोग तज्ज्ञ शांती राय यांच्या अतुलनीय कामगिरीचा आढावा
लग्नापूर्वी आनंदी यांनी 1990 ला पहिले रक्तदान केले होते. मे 2019 ला त्यांनी 42 वे रक्तदान केले. कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करणाऱ्या आनंदी या पहिल्या महिला असाव्यात. रक्तदानासोबतच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्या सध्या आशा टाईपरायटिंग इन्स्टीट्यूटच्या प्राचार्या आहेत. व्यापारी महासंघाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या परीक्षक /समीक्षक आहेत. त्यासोबत महाराष्ट्र राज्य टायपिंग असोसिएशन, मुंबई अंतर्गत जालना समितीमध्ये महिला आघाडीच्या संगणक तज्ज्ञ आहेत.
हेही वाचा...लोकांनी हिणवले, टोमणे मारले; पण 'ती'ने जिद्दीने गॅरेज चालवून चारही मुलांना बनवले डॉक्टर
अनेक महिला बचत गट आणि धार्मिक संस्थांच्या त्या सदस्या आहेत. हा सर्व डोलारा सांभाळत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या अत्यंत आत्मीयतेने गरीब कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत प्रशिक्षण देतात. एवढेच नव्हे तर ज्या महिला शिकू इच्छितात मात्र परिवारातील अडचणींमुळे शिकता येत नाहीत अशांनाही त्या 'आशा'मध्ये प्रशिक्षण देत आहेत.
नावाप्रमाणेच नेहमी आनंदी राहून इतर महिलांना आनंदी सतत प्रोत्साहन देत आहेत. तसेच महिलांनी व्यवसायाकडे वळावे, हा संदेश त्या आवर्जून देत आहेत. त्यासोबत महिलांवर होत असलेले अत्याचार याला, काही प्रमाणात महिलाही जबाबदार असल्याचे त्या सांगतात. हे पटवून देण्यासाठी त्या सिंधुताई सपकाळ यांचे उदाहरण देण्यास विसरत नाहीत.