जालना- श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या खुला रंगमंचावर 'नृत्य-नाद' या कथक नृत्याचे आणि बासरीवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रेक्षक चांगलेच रंगून गेले होते. रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. श्री सरस्वती भुवन प्रशाला द्वारा संचलित तर सरस्वती कला करिअर अकादमी आणि रियाज रेव्हरीद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाट्यांजली नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांनी कथक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. औरंगाबाद येथील अजय शेंडगे यांचे कथक नृत्य हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. प्राची लढा, सुरुची रायबागकर आणि नारायणी जाफराबादकर या नृत्यांगनांनी भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर औरंगाबाद येथील निरंजन भालेराव यांच्या बासरीवादनाचा आणि पुणे येथील तबलावादक प्रफुल्ल काळे यांच्याही जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.