जालना - जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, निवडणुकींचा प्रचार अजूनही थंड आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची सभा अद्यापपर्यंत जालना शहरात किंवा लोकसभा मतदारसंघात झाली नाही. त्यामुळे निवडणूक असूनही मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती नसल्यामुळे मतदारांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जालना मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा नाहीत, प्रचार थंडच - constituency
जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, निवडणुकींचा प्रचार अजूनही थंड आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून २० उमेदवार खासदार होण्यासाठी २३ एप्रिलला आपले नशीब आजमावणार आहेत. अवघ्या १० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. मात्र, राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष पक्षांच्या कोणत्याही उमेदवाराची अद्यापपर्यंत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे मतदारराजा आश्चर्य व्यक्त करीत आहे. अद्यापपर्यंत कोणतेच नेते प्रचाराला फिरकले नाहीत? त्यातच दैनिकांमध्ये निवडणुकी संदर्भात येणाऱ्या बातम्या देखील रोडावल्या आहेत.
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, सध्या खेड्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे, त्यामुळे शहरात अजून कुठल्याही सभा घेतल्या गेल्या नाहीत. पुढील आठवड्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा जालन्यामध्ये आणि लोकसभा मतदारसंघात घेतल्या जातील, अशी माहिती दिली. मात्र हे दिग्गज नेते कोण असतील हे कळाले नाही. प्रचंड उन्हामुळे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले असताना उमेदवारांचा प्रचार मात्र थंडच आहे.