जालना -सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक झाले आहे. असे असले तरीही काही जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आजही पास बंधनकारक करण्यात आलेला आहे.
चार गटांच्या जिल्ह्याची परिस्थिती
सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक केले आहे. त्यानुसार चार गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये दहा जिल्हे असून सर्व सुरू राहणार आहे. दुसऱ्या गटामध्ये दोन जिल्हे आहेत. जिथे 50 टक्के व्यवहार सुरू राहणार आहेत. त्यामध्ये नंदुरबार आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ तिसऱ्या गटामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्हामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना ई-पास शिवाय प्रवेश द्यायचा किंवा नाही याचे अधिकार त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र उर्वरित चौथ्या गटातील आठही जिल्ह्यांना त्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ई पास अत्यंत आवश्यक आहे आणि ते जिल्हे आहेत बुलडाणा, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर यांचा समावेश आहे.