जालना : भोकरदन तालुक्यासह शहरातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यने चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज(शुक्रवार) भोकरदन शहरात दहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे, भोकरदन तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 21 वर पोहोचला असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
भोकरदन शहरात शुक्रवारी कोरोनाचे १० रुग्ण वाढले; तालुक्यात भीतीचे वातावरण - jalna corona updates
भोकरदन शहरासह तालुक्यात आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दहाने वाढ झाली. यामुळे भोकरदन शहरात भीतीचे वातावरण वाढले आहे. दरम्यान शहरात जनता कर्फ्यू असूनसुध्दा असंख्य लोकं मात्र मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत होते. तर, दुकाने मात्र बंद होती.
भोकरदन शहरात जनता कर्फ्यू असूनसुध्दा शहरातील असंख्य नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत होते तर दुकाने मात्र बंद होती. दरम्यान, भोकरदन शहरात आज सकाळी 10 जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे, भोकरदन तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहोचली असून त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर, भोकरदन शहरात आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी तुळजाभवाणी नगर येथील तीन, कैलास मंगल कार्यलय परिसरातील चार, धावडा, वालसा व वडाळा येथील प्रत्येकी एक असे रहिवासी आहेत. त्यामुळे तुळजाभवानी नगर येथील आज सोळा जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तर, कैलास मंगल कार्यालय परिसरातील आठजणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांनी दिली.
दरम्यान सदर परिसर सील करण्यात आले असून यावेळी उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, तहसीलदार संतोष गोराडे सहमा मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्या आदेशानुसार विनामास्क दुचाकीवर फीरणाऱ्या 42 जणांवर 200 प्रमाणे कारवाई करण्यात आली. यामध्ये नगर परिषद कर्मचारी पथक प्रमुख बबण आप्पा देशमुख, बजरंग घुळेकर, भुषण पळसपगार, वैभव पुणेकर, शशिकांत सरकटे, गोवर्धन सोनवणे, सिध्दार्थ गायकवाड, अमोल देशमुख परसराम ढोके या कर्मचारीची उपस्थित होती.