जालना - जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदाच 24 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जालनेकरांची चिंता वाढली आहे. सकाळपर्यंत 86 असलेला आकडा दुपारनंतर110वर पोहोचला आहे. जालना जिल्ह्यात 6 एप्रिल रोजी पहिली कोरोनाबाधित महिला आढळून आली होती.
जालन्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 24ने वाढ; एकूण संख्या 110
जालना जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदाच 24 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे स्थानिकांची चिंता वाढली आहे. सकाळपर्यंत 86 असलेला आकडा दुपारनंतर110वर पोहोचला आहे.
जालना कोरोना अपडेट
दरम्यान, आज आलेल्या पॉझिटिव्ह अहवालांमध्ये अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील 6, अंबड शहरातील 2, जालना शहरातील 2, बदनापूर येथील 2, आणि अन्य काही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आता जालना शहरासह ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.