महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत'च्या पाठपुराव्याला यश, अखेर कदिम जालना पोलीस ठाण्याला मिळाली नवी इमारत - जानला बातमी

जालन्यातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील इमारतीमध्ये निजामकालीन इमारतीतील कदिम जालना पोलीस ठाणे स्थलांतरी करण्यात आले आहे. ही नवी इमारत तळ मजला अधिक एक मजला, अशी दुमजली आहे.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे

By

Published : Sep 3, 2020, 6:21 PM IST

जालना -कदिम जालना पोलीस ठाणे पूर्वी निजाम कालीन इमारतीत सुरू होते. या ठिकाणी पोलिसांसाठी कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. पिण्यासाठी पाणीसुद्धा या पोलीस ठाण्यातील पोलिसांना स्वतःच्या घरून आणावे लागत होते. तसेच निजामकालीन इमारत असल्याने वारंवार पडझड होत होती. यामुळे कदिम जालना पोलीस ठाण्याला नवीन इमारत मिळावी यासाठी 'ईटीव्ही भारत'ने दोन वर्षे सतत पाठपुरावा केला. अखेर या पोलीस ठाण्यासाठी दोन मजली इमारत मिळाल्याने ईटीव्ही भारतच्या पाठपुराव्याला व पोलिसांच्या मागणीला यश आले आहे.

कदिम जालना पोलीस ठाणे

शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात मागील अनेक वर्षांपासून एक इमारत बांधून तयार होती. प्रशासनातील काही वादामुळे इथे कुठलेही कार्यालय सुरू झाले नाही. चार महिन्यांपूर्वी ही इमारत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केली आणि कदिम जालना पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनीही वेळ न घालवता त्वरित काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनीदेखील एक पाऊल पुढे टाकत हालचालींना गती दिली. अखेर तळमजल्यासह दुमजी चोवीस खोल्यांच्या इमारतीत कदिम जालना पोलीस ठाणे सुरू झाले.

या इमारतीसाठी निधीची सर्वत्र कमतरता असताना दानशूर व्यक्तींची मदत घेऊन हे पोलीस ठाणे उभे केले आहे. इमारतीला मिळालेली मोकळी जागा आणि त्यामध्ये केलेले सुशोभीकरण हे महामार्गावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.

मागील आठ दिवसांपासून निजामकालीन इमारतीची साथ सोडून नव्या इमारतीमध्ये कदिम जालना पोलीस ठाण्याचे काम सुरू आहे. मात्र, या इमारतीचे अधिकृत उद्घाटन अद्याप झालेले नाही.

पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र

कदिम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या जालन्यातील सर्व भाग येतो. अंबड चौफुलीपासून अंबडकडे असलेला भाग हा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. सुमारे दीड लाख लोकसंख्येची सुरक्षा आणि वाद-विवाद मिटविण्याची जबाबदारी ही कदिम जालना पोलिसांवर आहे. पोलीस ठाण्यामध्ये सुमारे 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे.

हेही वाचा -पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणणे ही पक्षाची शिस्त नाही, आमदार दानवेंचा लोणीकर पिता-पुत्रांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details