जालना - आदिशक्तीचा विशेषता महिलांचा उत्साहाचा असलेला नवरात्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे. दरम्यान घरागुती घटस्थापने सोबतच सार्वजनिक मंडळांनी देखील वाजत गाजत देवींच्या मूर्तींची मिरवणूक काढून घटस्थापना केली आहे.
जालना शहरात सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात - नवरात्र उत्सव
शहरात सर्वत्र उत्साहात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून घटस्थापना करण्यात आली आहे.
![जालना शहरात सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4595857-thumbnail-3x2-jalna.jpg)
शहर आणि परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत घटस्थापना सुरू होती. सायंकाळी पाच वाजेनंतर सार्वजनिक दुर्गा देवी मंडळांनी नियोजित करून ठेवलेल्या देवीच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढत नियोजित ठिकाणी गेल्या. दरम्यान, ढोल ताशाच्या गजरात आणि डीजेवरील गाण्यांच्या तालावर देवी भक्तांनी ठेका धरला होता. भव्य दिव्य मूर्ती विविध वाहनांमधून घेऊन जाताना देवी भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. शहरातही विविध ठिकाणी देवीच्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मस्तगडावर असलेल्या मंमादेवी मंदिराजवळ आराधी महिलाही स्थानापन्न झाल्या आहेत. कवड्यांची माळ, दुरडी आणि पीठा घेऊन या देवी भक्त नऊ दिवस मंदिराजवळच बसणार आहेत.
हेही वाचा -...त्यामुळे गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे तेवढेच छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज - खासदार संभाजीराजे